VidhanSabha Election Mumbai Local Schedule : मुंबईकर मतदारांसाठी विशेष गाड्या, पाहा लोकलचं वेळापत्रक

VidhanSabha Election Mumbai Local Schedule : मुंबईकर मतदारांसाठी विशेष गाड्या, पाहा लोकलचं वेळापत्रकराज्यात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकांसाठीचं मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने तयारी केलेच आहे. पण मुंबईकर मतदारांच्या सोयीसाठी आता रेल्वेनं देखील पुढाकार घेतलाय. मुंबई आणि उपनगरातील नागरिकांसाठी लोकल म्हणजे लाइफलाइन आहे. हीच लाईफलाईन येत्या 20 नोव्हेंबरला मतदार राजासाठी धावणार आहे. निवडणुकीसाठी मध्य रेल्वेकडून रात्र कालीन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य लाईन (डाऊन लाईन): छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण विशेष गाडी CSMT येथून (20नोव्हेंबर ला पहाटे 3.00 वाजता सुटेल, कल्याणला पहाटे 4.30 वाजता पोहोचेल. मुख्य लाईन (अप): कल्याण – CSMT विशेष गाडी कल्याण येथून (20 नोव्हेंबर) पहाटे 3.00 वाजता सुटेल, आणि csmtला येथे (20 नोव्हेंबर) पहाटे 4.30 वाजता पोहोचेल. हार्बर लाइन (डाऊन): CSMT – Panvel लोकल पहाटे 3.00 वाजता सुटेल, मुख्य लाईन (डाऊन): scmt- कल्याण विशेष गाडी 21 नोव्हेंबरला मध्यरात्री 1.10 वाजता सुटेल. दरम्यान, मुंबई लोकलने मतदारांसाठी विशेष गाड्यांचं नियोजन केलं आहे. त्यामुळे मतदारांनी या दिवशी आवर्जून मतदान करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.Voting for assembly elections will be held in the state on November 20. The administration has already prepared for it. But for the convenience of Mumbaikar voters, railways have also taken the initiative. Local is the lifeline for the citizens of Mumbai and its suburbs. This lifeline is going to run for Voter Raja on November 20.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *