Kolhapur Dipotsav। कोल्हापुरात पंचगंगा घाट दिव्यांनी उजळला,त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा

Kolhapur’s Panchganga river ghats witnessed a dazzling light this morning due to the Tripurari Purnima Dipotsavam. Panchganga Ghat was lit up in the early morning with the dazzling and picturesque fireworks display of 51 thousand pantas set by the people of Kolhapur in this Deepotsav organized by Shivamudra Pratishthan. The couple conveyed the message of social commitment through attractive rangolis on various topics and the melodious confluence of devotional songs. Interestingly, citizens of Kolhapur and other districts also participated in this Deepotsav. Among the rangolis and scenes drawn today, the scene of the fire at the Keshavrao Bhosle theater was an eye-catcher and political messages were also conveyed through rangoli.त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्य केलेल्या दिपोत्सववामुळे कोल्हापूरच्या पंचगंगा नदीघाटावर आज पहाटे लखलख तेजाची न्यारी दुनिया पहायला मिळाली. शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या या दीपोत्सवात कोल्हापूरकरांनी लावलेल्या 51 हजार पणत्यांचा लखलखाट आणि नयनरम्य आतषबाजीने पंचगंगा घाट पहाटे उजळून निघाला. जोडीलाच विविध विषयांवरील आकर्षक रांगोळ्यांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश आणि भक्तिगीतांचा सुरेल संगम… आजचे हे दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी हजारो कोल्हापूरकरांनी पंचगंगा नदीघाटावर गर्दी केली होती. विशेष म्हणजे या दीपोत्सवामध्ये कोल्हापूर सह बाहेरील जिल्ह्यातील नागरिकांनीही हजेरी लावली होती. आज काढलेल्या रांगोळ्यांमध्ये आणि देखाव्यांमध्ये केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीचा देखावा हा लक्षवेधी होता तसेच रांगोळीच्या माध्यमातून राजकीय संदेश देखील देण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *