Vijay Vadettiwar । टीका करताना विजय वडेट्टीवार बरळले, मंगेशकर कुटुंबीयांवर पातळी सोडून टीका

Dinanath Mangeshkar Hospital has been caught in the vicinity of the dispute after the death of Tanisha Bhise in Pune. Therefore, there is a possibility of a new controversy. “He is a gang of Mangeshkar. This is a gang of robbers. He also raised the question as to whether anyone has ever seen donating to them … He has also said that everyone had sung because the song was well suited. I believe that this is a human -staunch family?पुण्यातील तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात अडकलंय.. यावरुनच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट मंगेशकर कुटुंबीय हे लुटारुंची टोळी असल्याचं विधान विजय वडेट्टीवार यांनी केलं. त्यामुळे आता नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. “कसले ते मंगेशकर कुटुंब. ही लुटारुंची टोळी आहे. यांच्यापैकी कुणी कधीही दान केल्याचं पाहिलंय का असा सवालही त्यांनी उपस्थित केला… गाणं चांगले गायलं म्हणून सगळ्यांनी त्यांना मिरवलं असा टोलाही त्यांनी लगावलाय. त्यांचं एवढच जर लोकांसाठी आणि देशासाठी समर्पण असतं तर त्यांनी सेवा केली असती. दुसरीकडे, ज्या खिलारे पाटलांनी त्यांना जमीन दिली त्यांनाही सोडलं नाही असा घणाघातही वडेट्टीवारांनी केला.. यांच्यात कसली माणुसकी आहे? हे माणुसकीला कलंक असलेले कुटुंब आहे असे मी मानतो. अशा प्रकारे चॅरिटी म्हणून फायदा घ्यायचा आणि गरिबांना लुटायचं हे धंदे बंद झाले पाहिजेत असंही ते म्हणालेत.. तसेच यांना कुणीही साथ देऊ नये. यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही वडेट्टीवारांनी पुण्यातील घटनेवरून केली आहे.. News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24×7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra’s political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat’s platform. Don’t miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App – https://onelink.to/desc-youtube

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *